शेअर बाजारातील आजचा दिवस तुलनेने काहीसा अस्थिर असल्याचं दिसून आलं.
तरीही बाजार बंद होताना तो काहीसा वधारला.
आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) 114 अंकांची वाढ झाली.
तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 64 अंकांची वाढ झाली.
सेन्सेक्समध्ये आज 0.19 टक्क्यांची वाढ होऊन तो 60,950 अंकावर स्थिरावला.
निफ्टीमध्ये 0.36 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,117 अंकांवर पोहोचला.
निफ्टी बँकमध्ये मात्र आज 39 अंकांची घसरण होऊन तो 41,258 अंकांवर बंद झाला.
आज बाजार बंद होताना एकूण 1997 शेअर्समध्ये वाढ झाली, तर 1356 शेअर्समध्ये घसरण झाली.
आज एकूण 129 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.
शुक्रवारी रुपयाची किंमत ही 82.88 इतकी होती. त्यामध्ये आज सुधारणा होऊन ती 82.43 वर पोहोचली आहे.