सोशल मीडिया वर #boycottmaldives या वेळेला खूप ट्रेंड होत आहे. 2021 च्या आकड्यानुसार मालदीव ची एकूण लोकसंख्या साडे 5 लाखाच्या आसपास आहे. मालदीव आशियातील दुसरा सर्वात छोटा देश आहे. पण तुम्हाला माहित आहे का मालदीव भारताच्या कोणत्या राज्याच्या बरोबरीने आहे. केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव ची लोकसंख्या मालदीव च्या लोकसंख्येशी मेळ खाते. दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव ची एकूण लोकसंख्या 5 लाख 85 हजार 764 आहे. या पद्धतीने विचार केल्यास मालदीव ची जवळपास लोकसंख्या दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव इतकी आहे. मालदीव एक इस्लामिक देश आहे त्याची 98 टक्के लोकसंख्या इस्लाम धर्म मानते. इस्लाम सोडून इतरही धर्माचे लोक इथे राहतात.