अभिनेत्री श्रीदेवी यांची आज चौथी पुण्यतिथी आहे. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईत त्यांचे निधन झाले होते श्रीदेवी यांनी सिल्व्हर स्क्रिनवर साकारलेल्या आपल्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट, 1963 मध्ये तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात झाला होता 'मुंदरु मुदिची' या तामिळ चित्रपटातून त्यांनी अभिनेत्री म्हणून करिअरची सुरुवात केली होती 80 ते 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये श्रीदेवीची जादू होती. श्रीदेवी यांना सिनेसृष्टीतील मोलाच्या योगदानासाठी पद्मश्री सन्मानाने सन्मानित करण्यात आले होते. 'चालबाज' आणि 'लम्हें' या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारसुद्धा मिळाला.