रॉयल चँलेजर्स बंगळुरुने सनरायजर्स हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुने 193 धावांचे मोठे आव्हान चेन्नईला दिले, पण हैदराबादचे फलंदाज हे आव्हान पार करु शकले नाहीत. बंगळुरुच्या गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे हैदराबादचा संघ 125 धावांवर सर्वबाद झाला. पहिली फलंदाजी करणाऱ्या बंगळुरुकडून फाफने आणि रजतने उत्तम सुरुवात केली. पण रजत 48 धावांवर बाद झाला. फाफला आधी मॅक्सवेलने 33 धावांची साथ दिली. तर फाफने 50 चेंडूत नाबाद 73 धावा झळकावल्या. 193 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबाद संघाची सुरुवातच खराब झाली. त्यांचा सलामीवीर अभिषेक आणि विल्यमसन शून्यावर बाद झाले. त्यानंतर मार्करम आणि राहुलने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मार्करम 21 धावा करुन बाद झाला. राहुल क्रिजवर असताना दुसऱ्या बाजूने मात्र एक-एक गडी बाद होतचं होते. बंगळुरुच्या गोलंदाजांनीही भेदक गोलंदाजी करत हे आव्हान पार करुन दिलं नाही.ं यावेळी वानिंदू हसरंगाने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने 4 षटकात केवळ 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.