उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवणाऱ्या काही उत्तम हर्बल टीबद्दल जाणून घेऊयात.



मधापासून तयार केलेला चहा तुम्हाला उन्हाळ्यात निरोगी ठेवू शकतो. तसेच, यामुळे तुम्हाला उष्णता जाणवणार नाही.



लेमन टी तुमच्या शरीराला थंड ठेवण्यासाठी प्रभावी ठरू शकते.



उन्हाळ्यात पुदिन्याचा चहाही पिऊ शकता. हा चहा तुमच्या शरीराला थंड ठेवतो. तसेच, वजन नियंत्रित करण्यासाठीही उपयुक्त आहे.



उन्हाळ्यात चहा प्यावासा वाटत असेल तर दुधाच्या चहाऐवजी तुळशीचा चहा प्यावा. हे तुम्हाला निरोगी आणि थंड देखील ठेवेल.



उन्हाळ्यात ग्रीन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे तुमच्या शरीराचे वजनही नियंत्रित करू शकते. (P.c. pixabay)



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.