दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
या सिनेमाच्या माध्यमातून अफजलखानाच्या वधाचा थरार प्रेक्षकांना अनुभवता येत आहे.
'शेर शिवराज' हा सिनेमा प्राइम टाईमला दाखवावा, यासाठी प्रेक्षक मागणी करत आहेत.
महाराष्ट्रात राहुन छत्रपतींच्या पराक्रमावर आधारीत सिनेमाला प्रेक्षकांची मागणी असून प्राइम टाईमला शोज का मिळत नाहीत, असा प्रश्न प्रेक्षक उपस्थित करत आहेत.
मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर यांसह विविध शहरांतून तसेच परदेशांतून सगळ्याच वयोगटांतील प्रेक्षकांनी 'शेर शिवराज' सिनेमाचे जोरदार स्वागत केले आहे.
'शेर शिवराज' सिनेमात चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत.
शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं दर्शन 'शेर शिवराज' या सिनेमात घडत आहे.
'शेर शिवराज' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
बॉक्स ऑफिसवर 'शेर शिवराज' हा सिनेमा चांगलाच धुमाकूळ घालत आहे.
खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पाल लांजेकर यांनी केलं आहे.