पुदिन्याच्या पानांमध्ये इतके पोषक तत्व असतात जे अनेक समस्या दूर करतात. .



पुदिना आपल्या पोटासाठी, त्वचेसाठी आणि तोंडासाठी फायदेशीर आहे.



उन्हाळ्यात चेहरा टवटवीत राहावा यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे.



उष्माघातापासून बचाव करण्यासाठी पुदिन्याची पाने खूप प्रभावी ठरतात.



उन्हाळ्यात बद्धकोष्ठता, पोटदुखी इत्यादी समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी पुदिन्याचे सेवन करा.



उलट्या थांबविण्यासाठी पुदिन्याच्या पानांचा रस प्या.



पुदिन्याची काही पाने बारीक करून त्यात कांद्याचा रस आणि 1 चमचा लिंबाचा रस घाला. यामुळे अन्न पचनास मदत होईल.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.