बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो.
सोनूनं कोरोनाकाळात अनेकांची मदत केली होती. त्यानंतर चाहत्यांनीही त्याचं आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यामातून तो आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात असतो.
नुकतीच सोनूनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. देशातील सर्वात मोठ्या थाळीला सोनू सूदचे नाव देण्यात आलं. यावर त्यानं पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
सोनू सूदने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक मोठी थाळी दिसत आहे. या थाळीमध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत.
सोनूनं या फोटोला कॅप्शन दिलं, 'भारतातील सर्वात मोठ्या थाळीला आता माझं नाव देण्यात आलं आहे. मी एक शाकाहारी माणूस आहे. तसेच माझ्यासारख्या कमी अन्न खाणाऱ्या माणसाचं नाव 20 व्यक्ती खाऊ शकतील अशा थाळीला दिले जाऊ शकते, असा मी विचार केला नव्हता.'
सोनूनं शेअर केलेल्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. अनेक नेटकऱ्यांनी सोनूच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
हैदराबादमधील जिसमत जेलमंडी नावाच्या हॉटेलमध्ये मिळणाऱ्या भारतातील सर्वात मोठ्या थाळीमध्ये विविध नॉनव्हेज पदार्थ आहेत. ही थाळी 20 लोक खाऊ शकतात.
थाळीचे फोटो सोनू सूदनं सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यानंतर अनेकांनी त्याला कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच तमिळ, तेलगू, कन्नड आणि पंजबी या भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील सोनूनं काम केले आहे.
चित्रपटांबरोबरच सोनू हा त्याच्या सामाजिक कार्यामुळे चर्चेत असतो.