सोनम कपूरने अलिकडेच तिचे नवीन फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत.



अति डाएट आणि वर्कआउट न करता तिने वजन कमी केल्याचे सांगितले आहे.



सोनम कपूर ही बॉलिवूडची फॅशन आयकॉन आहे.



मुलाच्या जन्मापासून सोनम बऱ्याच काळापर्यंत रुपेरी पडद्यापासून दूर आहे.



सोनम कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, आता तिने आपल्या पोस्ट प्रेग्नेंसीबद्दल सांगितले आहे.



सोनम कपूरने गोल्डन बॉर्डर असलेल्या पांढऱ्या लेहेंग्यात तिचे जबरदस्त फोटो शेअर केले आहेत.



पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत आहे.



ही छायाचित्रे शेअर करण्यासोबतच सोनमने तिचा मुलगा वायुच्या जन्मानंतर पुन्हा फिट होण्यासाठी काय केले आणि या प्रवासासाठी तिला किती वेळ लागला याबद्दल सांगितले आहे.



फोटो शेअर करताना सोनमने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला पुन्हा पुर्ववत होण्यासाठी 16 महिने लागले. कोणत्याही क्रॅश डाएट आणि अति व्यायामाशिवाय मी हळूहळू पुर्ववत होण्याचा प्रयत्न करत आहे. हे करताना मी स्वत:ची आणि बाळाची काळजी घेतली. मला माहित आहे मी अजून पूर्ण फिट झाली नाही आहे पण त्या मार्गावर नक्कीच आहे. पण हा शरीर बदल अविश्वसनीय आहे. स्त्री असणे ही एक विलक्षण गोष्ट आहे.'



सोनमच्या आई झाल्यानंतरच्या प्रवासाबद्दल तिचे हे बोलणे चाहत्यांना खूप आवडले.