बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लाडकी लेक आयरा काल बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकली. आमिर खानच्या लेकीच्या लग्नसोहळ्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नुपूरने हाफ पँट आणि टी-शर्ट अशा लूकमध्ये आयरासोबत लग्न केलं आहे. मराठमोळा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत कोर्ट मॅरेज करत आयराने लग्नगाठ बांधली आहे. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतील ताज लँड्स एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये रजिस्टर मॅरेज केलं आहे. त्यांच्या रजिस्टर मॅरेज आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आयरा आणि नुपूर यांचं रजिस्टर मॅरेज झालं असून येत्या 10 जानेवारीला दोघंही उदयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्नगाठ बांधणार आहेत. उदयपूरमध्ये होणाऱ्या या शाही विवाहसोहळ्याची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे. त्यानंतर 13 जानेवारीला मुंबईत बॉलिवूडकर आणि मित्रमंडळींसाठी एका भव्य रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. सलमान खानच्या घरी आमिरच्या लाडक्या लेकीचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला.