दाक्षिणात्य अभिनेत्री अमला पॉल (Amala Paul) अनेक वर्षांपासून जगत देसाई याच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. दोन महिन्यांपूर्वीच ती जगतबरोबर विवाहबंधनात अडकली. दरम्यान, तिने आता इन्स्टाग्रामवरुन गुड न्यूज दिली आहे. प्रेग्नंट झाल्यानंतर अमला पॉल हिचा आनंद गगनात मावत नाहीये. तिने बेबी बंप दाखवतानाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटो शूट करताना अमलाचा पतीही सोबत आहे. अमला आणि जगत 5 नोव्हेंबर 2023 रोजी कोच्चीमध्ये विवाहबंधनात अडकले होते. अमला पॉलाचा हा दुसरा विवाह होता.यापूर्वी तिने अभिनेता,दिग्दर्शक एएल विजय याच्याशी 2024 मध्ये विवाह केला होता. दरम्यान, 2017 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.