टिकटॉक स्टार सोनाली फोगाट हत्येप्रकरणी दोघांना अटक केली. सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी यांना अटक केली. सोनाली फोगाट यांच्या शरीरावर जखमा झाल्याचं आढळून आलं. सोनाली यांची हत्या झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. सोनाली यांनी 2008 साली भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी राजकारणासह सिनेसृष्टीतही काम सुरु केलं. पंजाबी आणि हरियाणवी चित्रपट आणि म्यूझिक व्हिडीओत काम केलं. 2016 साली त्यांच्या पतीचा रहस्यमय मृत्यू झाला होता. 2019 मध्ये भाजपकडून विधानसभेची निवडणूक लढवली. 2020 साली बिग बॉसमध्येही सहभागी होत्या.