सोनाली बेंद्रे लवकरच झी-फाईव्ह वरील मालिका ‘द ब्रोकन न्यूज’मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे.



विनय वैकुल दिग्दर्शित फेमस ब्रिटिश मालिका ‘प्रेस’ची सुधारित आवृत्ती आहे.



यामध्ये सोनालीव्यतिरिक्त जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराणा आणि किरणकुमार दिसणार आहेत.



सोनालीने या मालिकेचा एक छोटा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.



सोनाली म्हणते, ‘सेटवर परत येणे, सर्जनशीलतेत परत येणे, माझे सहकलाकार आणि दिग्दर्शकांशी संवाद साधणे, व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणणे, खूप छान वाटते.



सोनाली पुढे म्हणते, ओटीटीवर पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे.



या शोमध्ये मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी न्यूज चॅनलची कथा आहे.



सोनाली याआधी 2013 मध्ये वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटात दिसली होती.



कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली 'इंडियन आयडॉल' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये जज म्हणून दिसली आहे.