'पटलं तर घ्या' या कार्यक्रमादरम्यान सोनालीने तिच्यासोबत घडलेले अनेक किस्से शेअर केले आहेत. सोनाली म्हणाली,माझ्या पहिल्या सिनेमात मी मुख्य भूमिकेत होते. पण तरीदेखील त्या सिनेमात माझा आवाज नव्हता. सोनाली पुढे म्हणाली,माझा आवाज भसाडा असण्याने अनेक प्रोजेक्टमधून मला नाकारण्यात आले आहे. सोनालीचा 'मलईकोट्टई वलीबन' हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आजवर सोनालीने नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल अशा अनेक लोकप्रिय सिनेमांत काम केलं आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोनालीने अभिनयासोबत सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली गेल्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली आहे. सोनाली नुकतीच 'पटलं तर घ्या' या टॉकशोमध्ये सहभागी झाली होती. अल्पावधीतच सोनालीने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.