भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक दररोज तिच्या बोल्ड फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. अलीकडेच, अभिनेत्रीनं पांढऱ्या डीपनेक ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत. लेटेस्ट फोटोशूटचे हे फोटो नेहा मलिकने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेत. भोजपुरी इंडस्ट्रीतील टॉपटी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या बोल्ड अदांनी इंटरनेटवर धुमाकूळ घालतेय. नेहानं पांढरा डीपनेक आऊटफिट वेअर केलाय. तिच्या बोल्ड आऊटफिटमध्ये तिनं केलेलं क्लासी फोटोशून चर्चेचा विषय ठरतंय. कुरळे केस अन् ग्लॉसी मेकअपसह सिल्व्हर हिल्स वेअर करुन अभिनेत्रीनं तिचा लूक पूर्ण केलाय. फोटो शेअर करताना नेहानं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, हमेशा खुद को याद दिलाएं कि आप हर तरह से ब्लेस्ड हैं... नेहा मलिका सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. इन्स्टाग्रामवर तिचे 3 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. (PHOTO : @nehamalik335/Instagram)