मराठी चित्रपटसृष्टीमधील अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णीनं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. ती कुणाल बेनोडेकर सोबतचा फोटो शेअर करून सोनालीनं या पोस्टला खास कॅप्शन दिलं आहे. सोनालीनं कुणालसोबतचा फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये, 'लाँग डिस्टन्स मॅरिज... पण प्रेमाला सीमेची बंधनं नसतात ना.' दोघांच्या या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेनं आणि रसिका सुनिलनं सोनालीच्या या पोस्टला कमेंट्स केल्या आहेत. सोनाली आणि कुणालचा 7 मे 2021 रोजी विवाह सोहळा पार पडला. दुबईमधील एका मंदिरात सोनाली आणि कुणालचा विवाह संपन्न झाला. कुणालसोबतचे फोटो सोनाली नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असते.