राज्यात सोमवारी 1 हजार 966 नव्या रुग्णांची नोंद झाली राज्यात 12 रुग्णांचा मृत्यू झाला असून 11 हजार 408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या 36 हजार 447 ॲक्टिव रुग्ण आहेत. राज्यात आज 8 नवीन ओमायक्रॉन रुग्णांची भर पडली आहे. राज्यानंतर मुंबईचा विचार करता सोमवारी 192 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 350 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 1691 दिवसांवर आला आहे. कोरोनाची आकडेवारी कमी होत असली तरी काळजी घेऊन पूर्ण लसीकरण गरजेचे आहे.