नुकतेच सोनालीनं तिच्या बाली ट्रीपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सोनालीनं या फोटोला कॅप्शन दिलं, Bidding 2023 goodbye with A Compulsorypost from bali वरना passport रख लेते है सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनाली या फोटोंध्ये रेड ड्रेस आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. सोनालीनं तिच्या युट्यूब चॅनलवर देखील बाली येथील तिच्या ट्रीपचा व्लॉग शेअर केला आहे. सोनाली सोशल मीडियावर तिच्या विविध लूकमधील फोटो शेअर करत असते. सोनाली ही लवकरच मलाइकोट्टई वालीबान या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मलाइकोट्टई वालीबान या चित्रपटात सोनाली दाक्षिणत्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सोनाली तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.