प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. सोनालीनं नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पिंक करचा ड्रेस, डॉलचे इअरिंग्स अशा लूकमधील फोटो सोनालीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 'simple simple हवी…' असं कॅप्शन सोनालीनं या फोटोला दिलं आहे. सोनालीच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. सोनालीनं शेअर केलेल्या या फोटोवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'परी म्हणू की सुंदरा.?' सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. सोनालीचा चाहता वर्ग मोठा आहे.