मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी ही तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
हेमांगी ही वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते.
नुकतीच हेमांगीनं एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
या पोस्टच्या माध्यमातून हेमांगीनं तिला झालेल्या दुखापतीबाबत सांगितलं.
हेमांगीला ‘मन धागा धागा’ या मालिकेच्या सेटवर दुखापत झाली आहे. हेमांगीनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'परवा ‘मन धागा धागा’ च्या set वर scene करताना माझ्याकडूनच माझ्या पायाला दुखापत झाली. पायरी चढत असताना माझा अंदाज चुकला आणि पाय पायरीला जोरात आपटला. पायाच्या बोटाचं नख माझ्याच बोटात मागच्या मागे घुसलं. असली कळ गेली डोक्यात.'
'Shooting थांबवून आराम करायची ती वेळ नव्हती कारण already खूप उशीर झाला होता. Pack up ची वेळ उलटून गेली होती. म्हटलं आता जर मी माझ्या पायाला गोंजारत बसले तर जशी ती कळ माझ्या डोक्यात गेलीए तशी मी सगळ्यांच्या डोक्यात जाईन. काही नाही काही म्हणत scene पूर्ण केला. Pack up झालं. पाय झणझणत होता. ' असं पोस्टमध्ये तिनं लिहिलं.
हेमांगी 'लेक माझी दुर्गा' या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.
तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.