बॉलिवूडचा किंग खान अर्थातच शाहरुख खान याला त्याच्या चाहत्यांनी अनोखी भेट दिली आहे. 'मन्नत' बाहेर 300 पेक्षा अधिक चाहत्यांनी त्याच्या आयकॉनिक पोज देऊन विश्वविक्रम घडवला आहे या विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये देखील करण्यात आली आहे. यावेळी मन्नत बाहेर चाहत्यांनी नेहमीप्रमाणे गर्दी केली होती. जवळपास 30 सेकंदाहून अधिक काळ शाहरुखच्या आयकॉनिक पॉजमध्ये उभे राहायचे होते. शाहरुखचे चाहते हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. शाहरुखने देखील यावेळी चाहत्यांचा आनंदात सहभागी झाला होता. चाहत्यांसाठी मन्नत बाहेर येऊन आयकॉनिक पोज देण्याची त्याची सवय ही कित्येकांच्या आवडीची आहे.