बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज (2 जून) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्रीचा जन्म 2 जून 1987 रोजी बिहारमध्ये झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची ती मुलगी आहे. सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून केली होती. सलमान-सोनाक्षीचा 'दबंग' हा चित्रपट 2010मध्ये रिलीज झाला होता. सोनाक्षी सिन्हाने तिच्या पहिल्याच चित्रपटातून प्रसिद्धी मिळवली होती. पण, या चित्रपटापूर्वीच तिन्ही आपली ओळख ‘फॅशन डिझायनर’ म्हणून केली होती. तिने बराच काळ डिझायनर म्हणून काम केले होते. परंतु, जेव्हा सलमान खानने तिला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा सोनाक्षी सिन्हाचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. सलमानने पाहताच क्षणी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती.