प्रसिद्ध गायक केके (कृष्ण कुमार कुन्नाथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले केके यांच्या निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. केके यांनी आपल्या कारकिर्दीत 2500 हून अधिक गाणी गायली. एका गाण्यासाठी ते 5 ते 6 लाख रुपये घेत असे. केके लाइव्ह कॉन्सर्टमधून मोठी कमाई करत असायचे माहितीनुसार, लाइव्ह कॉन्सर्टसाठी केके जवळपास 10 ते 15 लाख रुपये घेत असे. केके यांनी मृत्यूनंतर करोडोंची संपत्ती मागे सोडली आहे. रिपोर्ट्सनुसार, KK यांची एकूण संपत्ती सुमारे 8 मिलियन डॉलर म्हणजेच 62 कोटी इतकी होती. केके हे इंडस्ट्रीतील सर्वात महागड्या गायकांपैकी एक होते