मधुमेह असणाऱ्यांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. मधुमेहींनी रात्रीच्या आहारात हलक्या पदार्थांचा समावेश करावा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं. मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करणं फायदेशीर ठरतं? रात्री सूपचं सेवन करणं फायदेशीर. भाज्यांपासून सूप तयार करणं हेल्दी असतं. हिरव्या पालेभाज्या, नारळ पाण्याचा आहारात समावेश करावा ओट्स, नाचणी, बाजरीच्या पिठापासून 1 ते 2 भाकऱ्या आणि डाळी, यांचा आहारात समावेश करावा काहीच खाण्याची इच्छा नसेल, तर रात्री 1 ग्लास दालचिनीचं पाणी प्या मधुमेह असलेल्या रुग्णांनी रात्री गोड पदार्थ खाणं टाळावं. रात्रीच्या वेळी तळलेले पदार्थ खाणं टाळावं. यामुळे शरीराच्या इतरही अनेक समस्या वाढतात