लसूण सोलताना अनेकदा खूप त्रास होतो. यामध्ये वेळही लागतो आणि मेहनतही. अशावेळी तुम्ही काही टीप्स फोलो करु शकता. त्यामुळे तुम्हाला लसूण सोलणं सोपं जाईल. सगळ्यात आधी एका वाटीमध्ये पाणी घ्या. आणि त्यामध्ये लसूण भिजत घाला. एका तासानंतर लसूण पाण्यातून बाहेर काढा. त्याचं साल आपोआप वेगळं होईल. जर लसूण सोलताना हात चिकट होत असतील तर हाताला तेल लावून लसूण सोलावा. यामुळे हात चिकट होणार नाहीत. जर लसाणाचा वरचा भाग थोडा कापला तर लसूण सोलण्यास सोपं जाऊ शकतं. एक डब्ब्यात लसूण घाला आणि जोरजोरात हलवा. यामुळे बरीच सालं वेगळी होण्यास मदत होऊ शकते.