ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहाच्या संक्रमणामुळे अनेक योग तयार होतात. सूर्यग्रहणाचा (Solar Eclipse) योग ऑक्टोबर महिन्यात होत आहे.
हे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण असून भारतात दिसणारे पहिले सूर्यग्रहण आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीमध्ये सूर्यग्रहण आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात इतर अनेक ग्रहांचे संक्रमण होत आहे.
विशेष योगायोग असा की यावेळी चंद्र, केतू, सूर्य, बुध आणि शुक्र हे पाच ग्रह तूळ राशीत राहणार आहेत.
काही राशींवर याचा अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत या 6 राशी
कन्या : या काळात कन्या राशीच्या लोकांचा अनावश्यक खर्च वाढेल.
तूळ : तूळ राशीतील सूर्यग्रहणासोबतच चंद्र, केतू, सूर्य, बुध आणि शुक्र हे पाच ग्रहही या राशीत भ्रमण करतील. या राशींच्या लोकांवर संकटांचा डोंगर कोसळू शकतो.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांवर सूर्यग्रहणाचा प्रभाव अधिक दिसून येईल. या काळात वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
मिथुन: सूर्यग्रहण आणि इतर ग्रहांच्या राशी बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांना जास्त मेहनत करावी लागेल. परिश्रमाचे फळ व्यर्थ जाणार नाही
वृश्चिक: या राशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम होईल. तुम्हाला पैशांबाबत तणाव जाणवू शकतो.
मकर: सूर्यग्रहणासह 5 ग्रहांचे संक्रमण मकर राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. या काळात तुमचे झालेले काम बिघडण्याची दाट शक्यता आहे.