दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून दिली जातात. आजच्या दिवशी आपट्याच्या पानांचा मान मोठा असल्याने ती घरी ठेवली जातात.
दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते
पण दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात?
विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला.
दसर्याच्या आधीच्या नऊ दिवसांत म्हणजेच नवरात्रात देवीच्या शक्ती रुपांनी दाही दिशांवर विजय मिळवला, असे सांगितले जाते.
पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तीपूजन करून शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला म्हणून या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात.
या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा या चार कृत्यांना अधिक महत्व आहे.
आपट्याला 'अश्मंतक' म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक' याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे.
आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.
आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते.