शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांनंतर, दसरा म्हणजेच विजयादशमी उत्सव साजरा केला जातो



हिंदू पौराणिक कथेनुसार, हा सण देवी दुर्गेचा महिषासुरावर विजय मिळवण्याचा दिवस आहे.



नवनवीन काम सुरू करण्यासाठी, खरेदीसाठी, वाहनांची आणि शस्त्रांची पूजा करण्यासाठी दसरा अत्यंत शुभ मानला जातो.



यंदा दसऱ्याला येणारे शुभ योग आणखीनच खास बनवत आहेत.



या योगांमध्ये पूजा आणि शुभ कार्य केल्याने खूप फायदा होतो.  



दशमी तिथी 4 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 02.21 पासून सुरू होऊन 5 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत असेल.



या दिवशी विजय, अमृतकाळ आणि दुर्मुहूर्त असे शुभ योग तयार होत आहेत. हे शुभ योग ज्योतिषशास्त्रात खूप महत्वाचे मानले जातात.



पंचांगानुसार विजयादशमी किंवा दसऱ्याला श्रवण नक्षत्र असणे अत्यंत शुभ असते, जे रात्री 9.14 पर्यंत राहील.



ज्योतिषशास्त्रानुसार, धनु, कुंभ, सिंह, मेष, वृश्चिक या राशींना करिअर आणि नोकरीत यश मिळण्याचे योग दिसत आहेत.



दसऱ्याच्या दिवशी ज्योतिष आणि धर्मात सांगितलेले काही शुभ कार्य करा. हे विशेष काम केल्याने जीवनात खूप आनंद आणि समृद्धी येते.