स्मृती इराणी यांची लेक शनेल नुकतीच कॅनडास्थित असलेल्या अर्जुन भल्लासोबत लग्नबंधनात अडकली आहे.
शनेल आणि अर्जुनचा शाही विवाहसोहळा राजस्थानमधील नागौर येथील खिमसार या 500 वर्ष जुन्या किल्ल्यात पार पडला आहे.
शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्यात इराणी आणि भल्ला कुटुंबीय उपस्थित होते.
'राजस्थानची संस्कृती' ही शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याची थीम होती.
स्मृती इराणी यांच्या लेकीच्या लग्नात राजस्थानी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आपल्या लाडक्या लेकीच्या लग्नात खूपच आनंदी दिसत होत्या.
कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत स्मृती इराणी यांच्या लेकीचा लग्नसोहळा पार पडला. या लग्नाचं फक्त 50 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं.
शनेल आणि अर्जुनच्या लग्नसोहळ्याचे फोटो व्हायरल होत असून यात स्मृती इराणी डान्स करतानादेखील दिसत आहेत.
7 ते 9 फेब्रुवारीदरम्यान शनेल आणि अर्जुनचा लग्न सोहळा थाटामाटात पार पडला.
शनेल आणि अर्जुनने लग्नाप्रमाणे रिसेप्शनसाठीदेखील एका खास जागेची निवड केली आहे.