आशा भोसले (Asha Bhosle) यांची नात जनाई भोसले (zanai Bhosle) ही सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. जनाई देखील आपल्या आजीप्रमाणं गायनाच्या क्षेत्रात करिअर करु इच्छिते. ती सोशल मीडियावर सतत अपडेट असते. आजी आशा भोसले यांच्याप्रमाणे तिला गायनाची आवड आहे. ती नेहमी तिचे आणि आशा भोसले यांचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर कित्येक चाहते आहेत. आशा भोसले यांची नात जनाई ही 20 वर्षांची आहे. जनाईनं आशा भोसले यांच्यासोबत अनेकदा मंच शेअर केला आहे. जनाईचं आजी लता मंगेशकर यांच्याशी देखील खास ट्युनिंग होतं.