'अनाथांची माय' अशी ओळख असणाऱ्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास वयाच्या 75 व्या वर्षी संपला.

त्यांच्या या सोनेरी प्रवासाचा घेतलेला आढावा...



सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा येथे झाला.

नको असताना मुलगी झाली म्हणून आई-वडिलांनी तिचे नाव चिंधी ठेवले.

वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी, मूळच्या बुद्धिमान असल्या तरी माईंना जेमतेम चौथीपर्यंत शिकता आलं.



माईंचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्यापेक्षा वयाने 26 वर्षांनी मोठा असलेल्या श्रीहरी सपकाळ याच्याशी झाला.

अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी माईंनी 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली.

या ठिकाणी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला, त्यांना जेवण, कपडे पुरवले.



या अनाथ मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केलं. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून त्यांची लग्न लावून दिली.

माईंचे जीवनाची सुरुवात 'नकुशी'ने झाली... नंतर त्यांनी एका अग्नीदिव्याप्रमाणे संघर्ष केला. केवळ स्वत:चंच नव्हे तर हजारो अनाथांच्या 'अवघ्या जीवनाचं सोनं' केलं.

अशा या 'अनाथांच्या माय' असलेल्या सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास आज संपला असला तरी त्यांच्या कार्याचा ठसा मात्र कायम राहणार आहे.