कियारा आडवाणी लवकरच सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. कियारा आता लग्नसोहळ्यासाठी जैसरमेरला रवाना झाली आहे. कियारा शनिवारी सकाळी कलिना विमानतळावर स्पॉट झाली आहे. कियाराच्या व्हाईट जंपसूट लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कियारासोबत विमानतळावर कुटुंबीयदेखील दिसत आहेत. कियारा आणि सिद्धार्थने अद्याप लग्नासंदर्भात अधिकृत भाष्य केलेलं नाही. कियारा आडवाणी सिद्धार्थ मल्होत्रासोबत 7 फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार आहे. कियारा आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. कियारा-सिद्धार्थच्या शाही विवाहसोहळ्यानंतर मुंबईत त्यांच्या ग्रॅंड रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे. कियारा आडवाणी आणि सिद्धार्थच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहणार आहेत.