मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारा अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट शेअर करत असतो. सिद्धार्थनं नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. पोस्टमध्ये सिद्धार्थनं त्याला मिळालेल्या 'फिल्मफेअर' या पुरस्काराबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. सिद्धार्थनं फिल्मफेअर पुरस्कारासोबतचा एक खास फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले,'माझं पहिलं फिल्मफेअर, पहिलं नेहमी स्पेशल असतं.' धुराळा या चित्रपटामधील अभिनयासाठी बेस्ट अॅक्टर इन सपोर्टिंग रोल या कॅगेटिरीमधील फिल्म फेअर देऊन सिद्धार्थला गौरवण्यात आलं. पोस्टमध्ये सिद्धार्थनं धुराळा या चित्रपटाच्या टीमचे आभार मानले. तसेच पोस्टमध्ये सिद्धार्थनं झी स्टूडिओचे देखील आभार मानले आहेत. सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ हे दोघे 'फिल्म फेअर पुरस्कार 2021' चे सूत्रसंचालन करणार आहेत.