स्फोटक, वादळ, अतुलनीय, सर्वोत्तम... ग्लेन मॅक्सवेल. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू ग्लेन मॅक्सवेलला जेवढी विशेषणं लावाल तेवढी कमीच. ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान सामन्यात मॅक्सवेलनं आयुष्यातल्या सर्वोत्तम खेळीचा नजराणा पेश केला. अफगाणिस्तान आपला सामना ऑस्ट्रेलियाशी नाहीतर दुखापतग्रस्त मॅक्सवेलशी खेळली प्रतिकूल परिस्थिती आणि त्यातही केवळ एका पायावर साऱ्या शरीराचं वजन पेलून 201 धावांची नाबाद खेळी खेळली 128 चेंडूंत नाबाद 201 धावा करत वेदननं व्हिवळणाऱ्या मॅक्सवेलनं 21 चौकार, 10 षटकार लगावले अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं लक्ष्य दिलेलं ऑस्ट्रेलियाची 19 व्या षटकात सात बाद 91अशी दाणादाण उडालेली पण मॅक्सवेल नावाचं वादळ मैदानात उतरलं आणि सामन्याचं चित्रच पालटलं ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. पॅट कमिन्सचा वाटा 68 चेंडूंत नाबाद 12 धावांचा होता. मॅक्सवेलनं अफगाणिस्तानच्या जबड्यात हात घालून विजय हिसकावला जेव्हा केव्हा विश्वचषकातल्या सर्वोत्तम खेळीचा उल्लेख येईल, तेव्हा-तेव्हा मॅक्सवेलचं नाव सर्वात आधी घेतलं जाईल.