अफगाणिस्ताननं विश्वचषक साखळी सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं आव्हान दिलं

विशेष म्हणजे सलामीचा इब्राहिम झादरान हा विश्वचषकात शतक झळकावणारा

इब्राहिम झादरान हा अफगाणिस्तानचा पहिला फलंदाज ठरला

इब्राहिम झादरानने वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात ही कामगिरी बजावली

इब्राहिम झादराननं 143 चेंडूंत नाबाद 129 धावांची खेळी उभारली

याआधी समिउल्ला शिनवारीनं 2015 सालच्या विश्वचषकात स्कॉटलंडविरुद्ध 96 धावांची खेळी केली

हा अफगाणिस्तानचा आजवरचा वैयक्तिक उच्चांक होता

हा विक्रम झादराननं मोडीत काढला

त्यानं एक खिंड नेटानं लढवून अफगाणिस्तानच्या प्रत्येक फलंदाजासोबत छोटी-मोठी भागीदारी रचली

त्यामुळंच अफगाणिस्तानला 50 षटकांत पाच बाद 291 धावांची मजल मारता आली