OTT प्लॅटफॉर्मवर दमदार कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar) शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर श्रियाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली. मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर. अभिनय, अभ्यास आणि इतर अनेक गोष्टींमध्ये श्रिया पिळगावकर पहिल्या क्रमांकावर आहे. श्रिया 24 वर्षांची असताना 2013 मध्ये वडील सचिन पिळगावकर यांच्या 'एकुलती' एक या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रियाला सर्वाधिक ओळख ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून मिळाली. श्रिया पिळगावकरनं नुकतेच ब्लॅक आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. श्रियाने ब्लॅक प्रिंटेड पलाझोसोबत ब्लॅक टॉप घातला होता. प्रिंटेड ब्लॅक श्रग घालून श्रियाने हा लूक पूर्ण केला आहे. 'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. (Photo credit : Instagram/@shriya.pilgaonkar)