शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटांपेक्षा छोट्या पडद्यावर अधिकच झळकत आहे. शिल्पा शेट्टी जरी छोट्या पडद्यावरील रिअॅलिटी शोमध्ये दिसत असली तरी तिच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. शिल्पा शेट्टीने एका मुलाखतीत करिअरमधील टर्निंग पॉईंटबद्दल भाष्य केले आहे. शिल्पाचे चित्रपट सलग फ्लॉप ठरत होते. हा तिच्या करिअरमधील आव्हानात्मक काळ होता. त्यावेळी तिने बिग ब्रदर हा रिअल्टी शो केला. त्यानंतर लोकांचा दृष्टीकोण बदलल्याचे तिने म्हटले. या शोमुळे लोकप्रिय झाले आणि करिअरदेखील काही प्रमाणात पूश झाले. सध्या शिल्पा शेट्टी ही एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणून दिसते. छोट्या पडद्यावर शिल्पा चांगलीच लोकप्रिय झाली आहे. शिल्पाचे सौंदर्य आणि फिटनेस पाहून ती 47 वर्षांची आहे यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही शिल्पा आपल्या योगाचे, एक्सरसाइजचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते.