अभिनेत्री शिवानी रांगोळे लवकरच अभिनेता विराजस कुलकर्णीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच शिवानी रांगोळेने होणाऱ्या सासूबाई अर्थात अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्यासोबत एक खास फोटोशूट केलं आहे. मृणाल कुलकर्णी आणि शिवानीने हे फोटोशूट ‘प्रथा’ या साडीच्या ब्रँडसाठी केले आहे. दोघीही या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहेत. चाहते देखील या फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत. ‘झी युवा’च्या ‘बनमस्का’ या मालिकेतून शिवानी रांगोळेला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. ‘व्हिक्टोरिया’ या मराठी हॉररपटामुळे सध्या अभिनेता विराजस कुलकर्णी प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातून तो दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. याशिवाय अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबतच्या रिलेशनशिपमुळेही अभिनेता चर्चेत आहे. शिवानी रांगोळे ‘बनमस्का’, ‘सांग तू आहेस का?’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरव गाथा’ या मालिकांमध्ये झळकली आहे. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे 7 मे 2022 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. पुण्यात त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. चाहत्यांसह संपूर्ण मराठी मनोरंजनसृष्टीचं लक्ष या बहुप्रतिक्षीत लग्नसोहळ्याकडे लागलं आहे. सध्या त्यांची लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.