शिव ठाकरे 'बिग बॉस 16'चा उपविजेता ठरला आहे.

उपविजेतेपदावर समाधान मानत शिव ठाकरे म्हणाला,अमरावती ते 'बिग बॉस 16' पर्यंतच्या प्रवासात अनेक गोष्टी शिकता आल्या.

शिव ठाकरे म्हणाला,सलमान खान माझ्यासाठी देव आहे.

शिव ठाकरे पुढे म्हणाला,माझा खास मित्र एमसी स्टॅन 'बिग बॉस 16'चा विजेता झाल्याचा मला अभिमान आहे.

शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकणार अशी शक्यता वर्तवली जात होती.

'आपला माणूस' शिव ठाकरे 'बिग बॉस 16' जिंकावा यासाठी चाहते वेगवेगळ्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत होते.

सलमान खानच्या आगामी सिनेमात शिव ठाकरे झळकणार असल्याचं समोर आलं आहे.

शिव ठाकरेने भाईजानचा 'बिग बॉस' चांगलाच गाजवला आहे.

शिव ठाकरे 'बिग बॉस' आधी एमटीव्हीच्या 'रोडीज' या कार्यक्रमात दिसला होता.

शिव ठाकरे 'बिग बॉस 16'चा विजेता न झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत.