बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाने अलीकडेच तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मलायका खूपच ग्लॅमरस दिसत आहे. मलायकाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. फोटोंमध्ये मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिसत आहे. मलायका अरोराने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. मलायकाने न्यूड मेकअप केला आहे. मलायकाने तिचे केस स्लीक ब्रेडेड स्टाईलमध्ये बांधले आहेत. मलायकाच्या आय फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.