शिव ठाकरेने इन्स्टाग्रामवर 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केल्यानंतर शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. शिवने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. शिवने लिहिलं आहे,मी खूप नशीबवान आहे की तुमच्यासारखी मंडळी माझ्यासोबत आहेत. शिव पुढे म्हणाला,माझं प्रत्येक स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्या प्रेम असचं राहुदे ... खूप खूप आभार. शिवच्या या पोस्टवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी कमेंट्स करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शिव ठाकरे 'बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता ठरला आहे. शिवची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. शिवचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला पाठिंबा देत आहेत. शिव ठाकरेला वीणा जगतापनेदेखील पाठिंबा दिला होता.