आज सफला एकादशी सफला एकादशीनिमित्त पुण्यातील अलंकापुरी सजली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील मुख्य गाभारा आकर्षक फुलांनी नटलेला आहे. ही विविध रंगांची फुलं भाविकांना आकर्षित करत आहे. 2021 मधील ही अखेरची एकादशी आहे. आजच्या दिवशीचे व्रत आचरल्यास हाती घेतलेल्या कामात यश मिळते. अशी अख्यायिका असल्याने अनेक भाविक आज एकादशी धरतात माऊलीच्या चरणी विविध साकडे घातले जातायेत. त्यात कोरोनाचा नायनाट कर असं साकडं आवर्जून घातलं जातंय. विठ्ठल आणि रुख्मिणी मातेची देखील यावेळी पूजा करण्यात आली. माऊलीचं या रुपात शोभून दिसत आहेत.