जागतिक बाजारातील तेजीचा प्रभाव भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. आज शेअर मार्केट उघडताच निर्देशांकातही तेजी दिसून आली. बाजार उघडताच सुरुवातीला सेन्सेक्स 386 अंकांनी वधारला. बाजाराच्या सुरुवातीला निफ्टीत 105 अंकांची उसळी पाहायला मिळाली. BSE सेन्सेक्स 291 अंकांच्या उसळीसह 61,566 वर उघडला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 79 अंकांच्या उसळीसह 18,094 वर उघडला. आज भारतीय शेअर बाजारात सर्वच क्षेत्रातील शेअर्स तेजीत आहेत. ओएनजीसी, पावर ग्रीड, एसबीआय, रिलायन्ससारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी पाहायला मिळाली. अदानींचे 7 पैकी 6 कंपन्यांचे शेअर्स वधारले आहेत.