शाहिद कपूरचा आगामी 'जर्सी' या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे.



यशचा 'केजीएफ चॅप्टर' आणि विजयचा 'बीस्ट' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाल्यामुळे चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याचे समजते.



या चित्रपटात शाहिदशिवाय मृणाल ठाकूरही मुख्य भूमिकेत आहे.



चित्रपट समीक्षक आणि विश्लेषक, तरण आदर्श यांनी अलीकडेच त्यांच्या ट्विटर हँडलवर शाहिद कपूरच्या आगामी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली आहे.



चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख एक आठवडा पुढे ढकलली गेली असून आता 22 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल, असे तरण आदर्श यांनी ट्विट करुन सांगितले आहे.



यासोबतच निर्मात्यांनी रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले आहे.