बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण सध्या त्याच्या रन-वे-34 या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स अभिनय क्षेत्रात करिअर करतात. अजय देवगणची मुलगी न्यासा ही देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. आता अजयनं न्यासाच्या बॉलिवूडमध्ये पदार्पणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीमध्ये अजला प्रश्न विचारण्यात आला की, 'न्यासा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे का?' या प्रश्नाला अजयनं उत्तर दिलं की, 'अभिनय क्षेत्रात काम करायची सध्या तिला इच्छा नाहिये. न्यासा या क्षेत्रात करिअर करेल की नाही, हे मला माहित नाही. ' अजय आणि काजोलची मुलगी न्यासा ही सध्या 18 वर्षाची आहे. ती शिक्षणासाठी सिंगापूर येथे गेली होती. आता ती स्वित्झर्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय हॉस्पिटॅलिटीचे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रानं न्यासाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.