काही वेळा काही लोक फणस खाल्ल्यानंतर अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांचे आरोग्य बिघडते. चला तर जाणून घेऊया, फणस खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत... फणसाची भाजी किंवा फणस खाल्ल्यानंतर पपई खाऊ नये. असे केल्यास त्वचेची ऍलर्जी होऊ शकते. तसेच तुम्हाला लूज मोशनची समस्या देखील उद्भवू शकते. फणस खाल्ल्यानंतर दूध पिऊ नये. त्यामुळे पोटात सूज येण्यासोबतच त्वचेवर पुरळ उठू शकते. फणस खाल्ल्यानंतर भेंडी देखील खाऊ नयेत. असे केल्यास पाय दुखण्याची समस्या होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीच्या समस्येलाही सामोरे जावे लागेल. बहुतेक लोकांना जेवणानंतर पान खाण्याची सवय असते. जर तुम्ही फणसाची भाजी खाल्ली असेल, तर त्या नंतर कधीही पान खाऊ नका.