शाहरुख खानला अमेरिकेत शूटिंगदरम्यान दुखापत झाली असून लगेचच त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
आता शस्त्रक्रियेनंतर शाहरुख मायदेशी परतला आहे.
शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शस्त्रक्रियेनंतर शाहरुखला फिट पाहून चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
शूटिंगदरम्यान शाहरुखच्या नाकाला दुखापत झाली होती.
शस्त्रक्रियेनंतर किंग खान आता भारतात परतला आहे.
शाहरुखला आजवर अनेकदा शूटिंगदरम्यान दुखापत झाली आहे.
शाहरुख खानचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
'डंकी' आणि 'टायगर 3' या सिनेमातही शाहरुखच्या अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे.
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.