अभिनेते, निर्माते दादा कोंडके यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे.
दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके असं आहे.
भालजी पेंढाकरांच्या 'तांबडी माती' या सिनेमाच्या माध्यमातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं.
दादा कोंडके यांचे सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम हे सिनेमे चांगलेच गाजले आहेत.
बँड पथकाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात करणाऱ्या दादा कोंडके यांनी सर्वसामान्य प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.
'सोंगाड्या' या सिनेमामुळे दादा कोंडके रातोरात सुपरस्टार झाले.
तेरे मेरे बीच में. अंधेरी रात में दिया तेरे हात में, खोल दे मेरी जुबान, आगे की सोच या हिंदी सिनेमांची दादा कोंडके यांनी निर्मिती केली आहे.
दादा कोंडके यांचा 'पांडू हवालदार' हा सिनेमादेखील सुपरहिट ठरला.
मराठी-हिंदीसह 'चंदू जमादार' या गुजराती सिनेमाची निर्मितीही दादा कोंडके यांनी केली आहे.
दादा कोंडकेंचा 'एकटा जीव सदाशिव' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.