बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 'पठाण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
2006 साली प्रदर्शित झालेला शाहरुखचा ‘डॉन’ चित्रपटही चांगलाच गाजला होता.
आता 'डॉन 3'मधून शाहरुखने एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान 'डॉन 3' या सिनेमात दिसणार नाही.
वेगळ्या पठडीतले सिनेमे करण्यासाठी शाहरुखने 'डॉन 3'ची ऑफर नाकारली आहे.
शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
शाहरुखचा 'डंकी' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी किंग खानचा 'पठाण' हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
शाहरुखच्या 'पठाण' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1050 कोटींचा गल्ला जमवला आहे.
शाहरुखच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना प्रतीक्षा आहे.