सावित्रीबाई फुले यांची आज जयंती

भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचा आज जन्म दिवस



सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला



त्यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो



सावित्रीबाईंना ज्ञानज्योती तसेच क्रांतीज्योती म्हणून देखील ओळखले जाते.



त्यांनी जात आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्यायकारक वागणूक नाहीशी करण्यासाठी काम केले



त्या व त्यांचे पती महात्मा ज्योतीराव फुले हे स्त्री शिक्षणाचे प्रणेते होते



आपल्या पतीच्या मदतीने सावित्रीबाईंनी पुणे शहरातील भिडे वाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली



स्त्री शिक्षणाच्या विरोधात असलेल्या समाजातील काही घटकांकडून सावित्रीबाईंना व त्यांच्या पतीला मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरे जावे लागले



१८९७ ला प्लेगची साथ आली असताना त्यांनी आपल्या प्रकृतीची पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले



दुर्दैवाने सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ ला त्यांचा मृत्यू झाला